Showing posts with label charolya. Show all posts
Showing posts with label charolya. Show all posts

Saturday, November 26, 2011

अरे चूप बस ना जरा



डोक्याला आहे ताप
मांडून ठेवले आहेत व्याप
आता चूप बस ना जरा


घेतले traning of sap
सगळे गळून गेले from tap
अरे त्याला बंद कर ना जरा


दुध पिऊन झालाय बॉस साप
अरे कुठे  फेडणार हे पाप
आता बस कर ना जरा

कंटाळून केली कंपनी swap
पण इथे हि तेच crap
आता वाजतील म्हणजे बारा

घरी जाऊन राजरोस
ऐकून तिचे रोजचे डोस
अगं चूप बस ना जरा

गळ्याचा घेतलाय माप
आता अजून एक necklace चा व्याप
अगं बस कर ना जरा

घरात आणि ऑफिस मध्ये सांभाळून तोरा
आता झडू लागलाय माझा तुरा
अरे नाचून थकला का रे मोरा




ही कविता weekend ला सकाळी आठ ला उठून cell वर लिहिली आहे त्यामुळे समजून घ्यावे


आशिष शेवाळे

Saturday, May 08, 2010

ajun kahi charolya

दूर गेल्या शिवाय
जवळ येता येत नाही
प्रेमात पडल्या शिवाय
वेडं होता येत नाही


वयात आल्यावर प्रेम कवितांशिवाय
दुसरा काही सुचत नाही
माणसात आल्यावर त्या कवितांवर
हसण्याशिवाय दुसरा काही उरत नाही


जग धावत असले तरी
मला धावण्यात रस नाही
चालत सुद्धा जिंकता येत असताना
धावण्याची मला हौस नाही

देवाची इच्छा असेल तर
माणूस उचलला जायला वेळ लागत नाही
पण यमाची इच्छा नसेल तर
साधं मरण सुद्धा गवसत नाही

Tuesday, March 09, 2010

माझ्या काही चारोळ्या

जमत नाही आता तुझ्यावीण जगणं
डोळ्यांना तुला बघण्यापासून तरसवण
मनातल्या इच्छांना घालता येत कुंपण
पण कसं शक्य आहे प्रेमाच्या सागराला आवरणं


माझ्या मनात जेव्हा पाखरू बनून तू उडतेस
माझ्या मनातल्या प्रत्येक फुलाला कसा तुझा सुगंध देतेस

तुला बघत असताना भान माझे हरपून जाते
तुझी कळी खुललेली पाहून जग माझे फुलून जाते


आठवण तुझी आली की रोमांच अंगी फुलतात
श्वास तुझा स्मरतो अन डोळ्यात आठवणी दाटतात