जमत नाही आता तुझ्यावीण जगणं
डोळ्यांना तुला बघण्यापासून तरसवण
मनातल्या इच्छांना घालता येत कुंपण
पण कसं शक्य आहे प्रेमाच्या सागराला आवरणं
माझ्या मनात जेव्हा पाखरू बनून तू उडतेस
माझ्या मनातल्या प्रत्येक फुलाला कसा तुझा सुगंध देतेस
तुला बघत असताना भान माझे हरपून जाते
तुझी कळी खुललेली पाहून जग माझे फुलून जाते
आठवण तुझी आली की रोमांच अंगी फुलतात
श्वास तुझा स्मरतो अन डोळ्यात आठवणी दाटतात
No comments:
Post a Comment