प्रेमाच्या सागरात बुडाल्यावर समजतं
गटांगळ्या खाणं काय असतं
मग गवताच्या पात्याच्या आधाराची अपेक्षा करणं
म्हणजे स्वतःला फसवणं असतं
इथे तर सगळं सोडून स्वतःला झोकून दिलेलं असतं
स्वतःच मी पण एका बंद कोपर्यात बांधून ठेवलेलं असतं
अशावेळेस जेव्हा मनाला वेदना होतात
आपली माणसं जेव्हा दूर लोटतात
मनाचा मग तोल सुटतो
प्रेमाचा अंकुर मुळापासून खुडतो
वार्याने पेटवलेला वणवा कोण थांबवू शकेल
प्रेमाला अजून एक वेडा प्रेमी फक्त मुकेल
1 comment:
Bhai 1 number....
Post a Comment