Thursday, September 29, 2011

सरळ गोष्ट सरळच असुदे

आजचा ब्लॉग थोडा रुक्ष वाटेल

गणितावर आहे ना

पण कधी कधी गणित पण जगण्याची पद्धत किंवा एखाद्या गोष्टी कडे बघण्याची पद्धत शिकवून जातं

खालील गणिताच कोडं असच आहे बघा सुटत का





एकदा ३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले

बिल आला ७५ रुपये

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटरला दिले
तू तू मी मी

मेनेजर ने ५ रुपये कन्सेशन दिला

वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन (आता का ते विचारू नका)

आणि तिघांना १, १, १ रुपया परत दिला

प्रत्येकाला २४ रुपये पडले

इथपर्यंत सगळं ठीक आहे




मग प्रत्येकाला २४ + २४ + २४ = ७२ रुपये पडले + वेटरचे २ रुपये = ७४
मग १ रुपया कुठे गेला???




आता लहानपणा पासून असं शिकवलं आहे की गणित कधी चुकत नाही मग हे काय झाल
असं मनात आलं ना की कुठे गेले ते गणिताचे मास्तर त्यांना घालतो हे कोडं आणि फिदीफिदी हसतो

पण असं झालाच कसं


मी सरळ उत्तर नाही देणार पण तुम्हा लोकांना भावार्थ समजेल









वेगळ्या प्रकारे ही गोष्ट मांडतो

त्या तिघांची नाव अ ब क
सगळं सारख फक्त ते पाच रुपये वेटर ने अ ला सगळे आणून दिले
आता
अ चा खर्च २० आणि ब आणि क चा २५ आहे
अ नी खुश होऊन वेटर ला २ रुपये टीप दिली

आता
अ चा खर्च २२ आणि ब आणि क चा २५ आहे

मग
अ नी ब ला १ आणि क ला १ रुपये दिले

आता
तिघांचा खर्च २४ रुपये सारखा झाला




अरे आता चुकलेलं गणित बरोबर कसं झाल
कारण एकच
गणित चुकत नही आपण चुकीच पाहत आहे
आता या ब्लॉग च शीर्षक पटल असेल








आशिष शेवाळे

No comments: