आज सकाळी उठलो
पाण्याचा नळ चालू केला आणि नळातून पाणी आलं
विश्वास होता पाणी असणार नळाला
मग फ्रीज उघडला दुध बाहेर काढलं चहा बनवण्यासाठी
विश्वास होता फ्रीज/इलेक्ट्रिसिटी रात्र भर चालू राहील आणि दुधाला नासवून देणार नाही
मग स्टोव चालू केला
विश्वास होता तो गरम होईल आणि चहा बनवायला मदत करेल
किती सहज या गोष्टी आपण गृहीत धरतो नाही
रात्री झोपताना विश्वास असतो उद्या सकाळ होईल सूर्य उगवेल म्हणून शांत झोपू शकतो
कोणीही कितीही म्हणल कि जगबुडी होणार आहे २०१२ ला तरीही ३० वर्षांनंतर फायदा होईल असा पेन्शन
प्लान आपण घेतो
पण आपण नक्की कोणावर विश्वास ठेवत असतो
कोणाच्या बोलण्यावर
स्वतःवर
का आपल्या विस्वास ठेवण्याचा ताकदीवर
आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ती गृहीत धरतो कारण आपण त्या शिवाय जगू शकत नाही
आपण आपल्या मनाला समजावत असतो कि सगळं ठीक आहे काही काळजी करायची गरज नाही
पण खरच का आपण इतकं निश्चितपणे सांगू शकतो का
थोडक्यात आपणआपल्या मनाला फसवत असतो पण त्या फसवाण्यावर आपण विश्वास ठेवत असतो
एकूण सांगायचं तर
आपण आपल्या विश्वास ठेवण्यावर विश्वास ठेवतो
आपल्या फसवाण्यावर विश्वास ठेवतो
किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर
आपण विश्वासावर विश्वास ठेवतो
आशिष शेवाळे
1 comment:
vishwasawr vishwas thevto.. too good!!!
Post a Comment