दूर गेल्या शिवाय
जवळ येता येत नाही
प्रेमात पडल्या शिवाय
वेडं होता येत नाही
वयात आल्यावर प्रेम कवितांशिवाय
दुसरा काही सुचत नाही
माणसात आल्यावर त्या कवितांवर
हसण्याशिवाय दुसरा काही उरत नाही
जग धावत असले तरी
मला धावण्यात रस नाही
चालत सुद्धा जिंकता येत असताना
धावण्याची मला हौस नाही
देवाची इच्छा असेल तर
माणूस उचलला जायला वेळ लागत नाही
पण यमाची इच्छा नसेल तर
साधं मरण सुद्धा गवसत नाही