Wednesday, July 06, 2011

व्यक्त

संध्याकाळ ...
दाटलेलं आभाळ
मोर पिसारा फुलवायला
मन भरून नाचायला
पावसात चिंब व्हायला पिसारा फुलवून तयार
तितक्यात तिच्यावर हलकेच सूर्यकिरण ढगांमधून वाट काढून पडतात
आधीच तिचे डोळे पावसासाठी अधीर आता आणखीनच चमकतात
ढगांकडे पावसाचा आनंद व्यक्त करायला विजा आहेत गडगडाट आहे
मोराकडे त्याचं पिसारा आहे
पण तिच्याकडे...
तिच्याकडे तिच सुंदर मोहक लाजणार हसू आहे
फरक फक्त व्यक्त करण्यामध्ये आहे





हे मी vegas मध्ये venetian होटेल मध्ये पाहिलेल्या enchantment चित्राचं वर्णन आहे