Saturday, April 03, 2010

तुझ्यासोबत...तुझ्यासोबतीने.........

तुला एकट सोडून
मी कधी जाणार नाही
कितीही पावसाच्या सारी पडल्या तरी
दवबिंदूला हरवू देणार नाही

पुढे जाताना
मागे वळून बघणार नाही
पण तुला बरोबर घेतल्या शिवाय
पुढे पाऊल टाकणार नाही

पुढच्या जन्मासाठी पुण्य कमावण्यात
या जन्मी वेळ घालवणार नाही
"चार दिनो कि जिंदगी" मध्ये
कुठलाही थेंब एकटा पिणार नाही

मारण्याची वेळ आलीच
तर एकट तुला सोडणार नाही
कारण आपण वेगळं झालो तर
आपल्या अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही

- आशिष शेवाळे


ही कविता पहिल्यांदा वाचताना प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाची वाटते
पण जर हीच कविता माझ्या जगण्याने, life ने, माझ्यासाठी लिहिली आहे असे समजून वाचली तर नवीन अर्थ समोर येईल